व्हाईट हाउस मध्ये पोहोचला करोना


फोटो साभार द वीक
अमेरिकेत करोना संकट दिवसेनदिवस अधिक गहिरे होत चालले असून आता करोनाची पाउले अध्यक्षांच्या निवासस्थानी म्हणजे व्हाईट हाउस मध्ये पडण्याच्या मार्गावर आहेत. अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हंका त्यांच्या खासगी सचिव म्हणजे पीएची करोना टेस्ट पोझिटिव्ह आली असल्याचे जाहीर केले गेले आहे. अर्थात सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार ही सेक्रेटरी गेले दोन महिने इव्हान्का यांच्या संपर्कात नव्हती तर ती टेलीवर्किंग करत होती. तिच्यात करोनाची कोणतीही लक्षणे नव्हती मात्र खबरदारीचा उपाय म्हणून तिची करोना टेस्ट केली गेली ती पोझीटीव्ह आली आहे. इव्हंका आणि त्यांचे पती जारेड यांच्या करोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचेही सांगितले जात आहे.

एक दिवसापूर्वीच उपराष्ट्रपती माईक पेन्स यांची प्रेस सेक्रेटरी केटी मिलर हिची करोना टेस्ट पोझिटिव्ह आल्याचा रिपोर्ट आला होता. ती कोणाकोणाच्या संपर्कात आली त्याची तपासणी सुरु असून तिचे कॉन्टॅक्ट ट्रेस केले जात आहेत. व्हाईट हाउस मधील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे बंधनकारक केले गेले असून त्याच्या शरीराचे तापमान रोज चेक केले जात आहे. व्हाईट हाउस मधील कर्मचारी करोना पोझिटिव्ह सापडण्याची ही तिसरी घटना आहे.

विशेष म्हणजे व्हाईट हाउस करोना टास्क फोर्सचे नेतृत्व माईक पेन्स याच्याकडेच असूनही ते एका क्लिनिक मध्ये गेले तेव्हा त्यांनी मास्क घातलेला नव्हता तसेच अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनीही मास्क वापरण्यास नकार दिला आहे.

Leave a Comment