व्हिडीओ : विद्युत जामवालचा देशी वर्कआउट, नेटिझन्स म्हणाले ‘बैल डन भाई’

फिटनेस आणि मार्शल आर्टसाठी ओळखला जाणार अभिनेता विद्युत जामवाल नेहमीच आपल्या कारनाम्याने आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत असतो. आता लॉकडाऊनमध्ये जिम बंद असल्याने विद्युतने फिटनेससाठी चक्क बैलगाडी ओढली आहे. याचा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, तुमच्या आत जन्मजात असलेल्या प्राण्याच्या शक्तीचा असा वापर करा.

केरळचा मार्शल आर्ट कलरीपायट्टूचा प्रशिक्षित असलेला विद्युत सध्या लॉकडाऊनमध्ये आपल्या गावी आहे. या काळात विद्युत आपल्या फिटनेसला आणखी उच्च पातळीवर नेत आहे.

विद्युतचा हा बैलगाडी ओढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, इंस्टाग्रामवर आतापर्यंत या व्हिडीओला 8 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे. तर शेकडो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment