उद्या पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार पंतप्रधान


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्या दुपारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊन संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.

उद्या दुपारी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचे वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी उद्या होणारी ५ वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत असल्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आला. हा तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा १७ मे रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते.

Leave a Comment