धक्कादायक; राज्यातील ७८६ पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात


मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण सापडण्याचा वेग दुप्पट झाला की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे, देशभरातील कोरोनाग्रस्तांची सर्वात जास्त आकडेवारी एकट्या महाराष्ट्रात दिसून येत आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच यामध्ये कोरोना वॉरिअर्सचा देखील समावेश आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कर्मचारी या संकटाचा सामना करत आहेत. आतापर्यंत सात पोलिसांनी या संकटाचा सामना करताना आपले प्राण गमावले असून तब्बल ७८६ पोलिसांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे.

त्याचबरोबर दिलासादायक बाब अशी की, कोरोनावर ७६ पोलिसांनी मात केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. राज्यात मागील २४ तासांत तब्बल दीडशे पोलिसांना कोरोनाने आपल्या विळख्या घेतले आहे. एकट्या मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांची संख्या अडीचशेच्या घरात आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे पोलिस दलात अस्वस्थ वातावरण निर्णाण झाले आहे.


त्याचप्रमाणे राज्यातील तब्बल तीन हजार पोलिसांना आयसोलेशन वॉडमध्ये ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे याचा फटका पोलिसांच्या कुटुंबाला देखील बसताना दिसत आहे. त्यांच्या संपर्कात आल्याने कुटुंबीयांनाही आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात येत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत २० हजार २२८ रुग्ण आढळले आहेत. तर ७७९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वात मोठी आहे.

Leave a Comment