रायगड जिल्ह्याची पुन्हा रेड झोनकडे वाटचाल; उरणमधील एकाच कुटुंबातील 21 जण कोरोनाबाधित


रायगड – राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 20 हजारच्या पार गेली असून त्यातच राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. रायगडमधील उरण तालुक्यात एकाच वेळी 21 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे उरणमधील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

उरण तालुक्यातील एकाच कुटुंबातील 21 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्वजण करंजा गावातील एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्या सर्वांना कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे. त्यातील 15 जणांना नवी मुंबईतील एमजीएम कामोठे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पण अशा पद्धतीने एकाच दिवशी एवढे रुग्ण आढळल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. तसेच रायगड जिल्हा पुन्हा रेड झोनकडे वाटचाल करत असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment