जगभरात 41 लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त, तर 14 लाखांपेक्षा जास्त कोरोनामुक्त


मुंबई : कोरोना या जीवघेण्या व्हायरसचा कहर जगभरातील 212 देशांमध्ये कायम असून जगभरात मागील 24 तासात 88,987 नवीन कोरोनाबाधित आले आहेत. तर मागील 24 तासात जगभरातील 4,248 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे बळी गेल्यांची संख्या जगभरात 2 लाख 80 हजार 224 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 41 लाखांवर गेली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे जगभरातील 14 लाख 36 हजार 206 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगातील 73 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 29 लाख 90 हजारांवर कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

महासत्ता असलेल्या अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाबाधित तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 13,47,309 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 80,037 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. अमेरिकेनंतर ब्रिटनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे 31,587 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांचा आकडा 2,15,260 एवढा आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 26,478 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2,62,783 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 30,395 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 218,268 एवढा आहे.

जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 80 हजारांवर गेला आहे.

Leave a Comment