मुंबईत कोरोनाने घेतला आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा बळी


मुंबई : कोरोनाचा संसर्ग राज्यासह मुंबईत झपाट्याने वाढत असून कोरोना व्हायरसमुळे रविवारी आणखी एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे महाराष्ट्र पोलिस दलातील सातव्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 7 पोलिस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात मुंबईतील 5 तर पुणे, सोलापूर आणि नाशिक येथील एक-एक पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


रविवारी उपपोलिस निरीक्षक सुनील दत्तात्रय कलगुटकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील विनोबा भावे पोलिस स्टेशनमध्ये ते कार्यरत होते. दरम्यान, नाशिकमध्ये कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल साहेबराव झिप्रु खरे यांचा काल शनिवारी मृत्यू झाला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती आणि काल त्यांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment