एअर इंडियाच्या 5 पायलट्सना कोरोनाची लागण


नवी दिल्ली – देशाभोवती कोरोनाचा फार्स अधिकच आवळत असताना आता एअर इंडियाच्या 5 पायलट्सना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पायलट्सची विमान उड्डाण घेण्याच्या 72 तास अगोदर तपासणी करण्यात आली होती. त्यात 5 जणांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. हे सर्व पायलट मूळचे मुंबईचे असून चीनला जाणाऱ्या कार्गो फ्लाईट्सचे ते पायलट असल्याची माहिती एअर इंडियाच्या सुत्रांनी दिली आहे. औषधांची या कार्गो फ्लाईट्स ने-आण करत असून त्या चीनमधील गुआंगझोउ येथून दिल्ली पर्यंत प्रवास करतात.


विमान उड्डाणापूर्वी 5 दिवस पायलट्सची कोरोना चाचणी करण्यात येते. त्याचप्रमाणे या पायलट्सची देखील चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर ते कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. दरम्यान लॉकडाऊनमुळे इतर देशांत अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी वंदे भारत मिशन सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी विविध देशांत एअर इंडियाच्या विशेष उड्डाणांना सुरुवात झाली असून पहिला टप्पा 9-15 मे या काळात पार पडणार आहे.

Leave a Comment