व्हिडिओ; शोएब अख्तर म्हणतो; कतरिना माझ्याकडे येऊन करायची सलमानची तक्रार


बॉलीवूडची चिकनी चमेली अर्थात अभिनेत्री कतरिना कैफ ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. त्यातच ती या फ्लॅटफॉर्मवरुन आपल्या चाहत्यांसाठी आपले नवनवीन फोटो त्याचबरोबर काही माहिती देखील शेअर करत असते. त्यामुळे सोशल मीडियात ती कायम चर्चेत असते. पण यावेळी कतरिना कैफ पाकिस्तानाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरमुळे चर्चेत आली आहे. शोएबने एका मुलाखती दरम्यान कतरिनाने माझ्याकडे येऊन सलमानबद्दल तक्रार केल्याचा दावा केला होता.

सध्या सोशल मीडियावर शोएब अख्तरचा एक थ्रोबॅक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. शोएब या व्हिडीओमध्ये म्हणत आहे कि, कतरिना व माझी बंगळूरुमध्ये असताना भेट झाली होती. कतरिना त्यावेळी मला म्हणाली सलमान आणि तुला न्यूजच्या बाहेर ठेवणे अशक्य असून तुम्ही दोघे कायमच वादात असता. त्याने शाहरुख खान आणि इतर बॉलिवूड कलाकारांचे किस्से यानंतर सांगितले.

२००८ सालचा हा व्हिडीओ असून जिओ टीव्हीसाठी शोएब अख्तरची पाकिस्तानी खेळाडू रमीज राजा यांनी मुलाखत घेतली होती. बॉलिवूड कलाकारांचे त्यावेळी किस्से सांगत असताना कतरिना सलमानचा शोएबने हा किस्सा सांगितला होता. सलमान खान त्यावेळी कतरिनाला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण कतरिनाचे नाव काही कालावधीनंतर रणबीर कपूरसोबत जोडले जाऊ लागले.

Leave a Comment