सीरम इन्स्टिट्यूटची लस कोरोनाच्या सर्व म्युटेशनवर प्रभावी ठरेल : आदर पूनावाला


मुंबई : जगभरातील असंख्य तज्ज्ञ आणि संशोधकांसाठी कोरोना व्हायरस मोठे आव्हान ठरत असून जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम वाढतच आहे आणि त्यातच त्याचे बदलत असलेले स्वरुप शास्त्रज्ञांसाठी एक कठिण आव्हान बनले आहे. त्या बदल झालेल्या व्हायरसमुळेच लक्षणे न आढळणारे रुग्ण देखील आता समोर येत आहेत. पण असे असले तरी सर्व म्युटेशनवर सीरम इन्स्टिट्यूटची लस प्रभावी ठरेल, असे सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पूनावाला यांनी म्हटले आहे.

ब्रॉड-स्पेक्ट्रम प्रकारातील आपण विकसित करत असलेली लस ही आहे. वेगवेगळ्या सर्व म्युटेशनवर ही लस परिणामकारण ठरणारी असेल. आपल्याला जर काही गंभीर बदल असल्याचे आढळले तर आपल्याला सध्याच्या लसीची कार्यक्षमता निश्चित करण्यासाठी फक्त नवी चाचणी करावी लागेल, असे पूनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


जगभरातील अनेक देश कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्याच्या अंतिम टप्यात असल्याचा दावा करत असताना किंवा लस विकसित झाल्याचा दावा करत आहेत. पण काही देशांची शास्त्रज्ञ मंडळी कोरोनाच्या मूळ व्हायरसमध्ये म्युटेशन होत असल्यामुळे म्हणजे रचनात्मक बदल होत असल्यामुळे काळजी व्यक्त करत आहेत. बदललेला दुसरा विषाणू जास्त संर्सगजन्य असून तो कदाचित जास्त घातक ठरत असल्याची चिंता देखील हे शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.

Leave a Comment