डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब दावा; विना औषध माघारी जाईल कोरोना


नवी दिल्ली : कोरोना व्हायरस हा कोणत्याही औषधाविना माघारी जाईल, असा अजब दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तर येत्या काळात कोरोनामुळे अमेरिकेत होणाऱ्या मृत्यूंची संख्या ९५ हजार किंवा त्यापेक्षाही पुढे जाईल, असे म्हणाले आहेत.


जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कारण जगभरातील इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत सर्वात जास्त कोरोनाग्रस्त आहेत. तर दिवसागणिक तेथील मृतांचा आकडादेखील वाढत आहे. त्यातच अमेरिकेसह अनेक देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधक लस शोधत आहेत. पण आता डोनाल्ड ट्रम्प यांनी लस नाही आली तरी चालेले, कोरोना हा विना औषधाचा माघारी जाईल, असे वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले की, कोणत्याही औषधाविना कोरोना व्हायरस हा माघारी जाईल. असा माघारी जाईल की त्याला आपण पुन्हा पाहूच शकणार नाही. आत्तापर्यंत अनेक आजार आले आणि कोणत्याही औषधाविना निघून देखील गेले तसाच कोरोना देखील जाईल. हे सगळे लगेच घडेल का? तर तसे माझे म्हणणे नाही. पण एक वेळ अशी येईल की जगभरातून कोरोना नाहीसा झालेला असेल.

Loading RSS Feed

Leave a Comment