कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात 40 दिवस दारूची दुकाने बंद होती. ज्या दारू विक्रेत्यांनी नियमांचे उल्लंघन केली, त्यांची दारू पोलिसांनी जप्त केली होती. तेलंगानाच्या करिमनगर येथील II टॉउन पोलिस स्टेशनने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची दारू जप्त केली होती. मात्र पोलिस स्टेशनमधूनच यातील 69 बाटल्या चोरी गेल्या.
येथे चक्क पोलिसांनीच लंपास केल्या जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या
अखेर या बाटल्या कोठे गेल्या हे पाहण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर चोर समोर आले आहे. या बाटल्या चोरी करणारे इतर कोणी नाही तर स्टेशनमधीलच कॉन्स्टेंबल अरूण आणि त्यांचा ड्राईव्हर राणा होता. या संदर्भात स्टोरीपीकने वृत्त दिले आहे.
दोघांविरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात आला असून, दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.