जगभरातील 13 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त


मुंबई : जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोना या जीवघेण्या व्हायरसचा कहर सुरुच आहे. जगभरात मागील 24 तासात कोरोनाचे 96,104 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 5584 लोकांना मागील 24 तासात कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात मृत्यूंची संख्या 2 लाख 70 हजारांवर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 39 लाख 13 हजारांवर पोहोचली आहे. तर जगभरात 13 लाख 40 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जगातील 73 टक्के कोरोनाग्रस्त हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 28 लाख 65 हजार कोरोनाग्रस्त आहेत.

अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाग्रस्त आणि तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेतील 12,92,623 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 76,928 लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनामुळे 26,070 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2,56,855 लोकांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 30,615 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,06,715 इतका आहे.

जर्मनी, रशिया, ब्राझिलसह अन्य दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 75 हजारांच्या वर गेला आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment