देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात ३३९० नव्या रुग्णांची वाढ


नवी दिल्ली – आज दिवसभरात कोरोनाचे ३३९० नवीन रुग्ण देशभरात आढळले असून मागील २४ तासांमध्ये समोर आलेली ही आकडेवारी असल्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी ५६ हजार ३४२ एवढी झाली आहे. तर मागील चोवीस तासात १३७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत १६ हजार ५४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

देशभरात मागील २४ तासांमध्ये कोरोनाची बाधा होऊन १०३ जणांचा मृत्यू झाला. तर देशात आत्तापर्यंत कोरोनाची बाधा होऊन १८८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सापडणाऱ्या कोरोना रुग्णांपैकी प्रत्येक ३ रुग्णांमधला एक रुग्ण बरा होत असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर देशभरात असे २९ जिल्हे जिथे मागील २१ दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. तर ४२ जिल्हे असे आहेत जिथे २८ दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. तर मागील सात दिवसांपासून ४६ जिल्हे असे आहेत ज्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

Leave a Comment