कोरोना वॉरिअर्सच व्हायरसच्या विळख्यात, राज्यातील 531 पोलीस कोरोनाग्रस्त


मुंबई : जगभरातील 212 देशांसह आपल्या देशात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाविरुद्ध फ्रण्ट लाईनवर लढणाऱ्या कोरोना वॉरिअर्समध्येच हा संसर्ग वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. राज्यातील तब्बल 531 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये 51 अधिकारी आणि 480 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कर्तव्य बजावणाऱ्या पाच पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

सद्यस्थितीत राज्यातील 43 अधिकारी आणि 444 कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. तर या व्हायरसपासून आतापर्यंत 39 पोलिसांना मुक्ती मिळाली असून त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. यामध्ये आठ अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तर मुंबईतील तीन तसेच पुणे आणि सोलापूरमधील प्रत्येकी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे पोलिसांना दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

Leave a Comment