दारूसाठी रांगेत उभे राहणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करा – इम्तियाज जलील

लॉकडाऊनमध्ये दारू विक्रिला परवानगी दिल्यानंतर दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागत आहे. दुकानांबाहेर गर्दी होत असल्य सोशल डिस्टेंसिंगचे पालन होताना दिसत नाही. याच पार्श्वभुमीवर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दारूसाठी रांगा लावणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात इम्तियाज जलील यांनी ट्विट केले की, औरंगाबादमध्ये एकही दारूचे दुकान उघडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. सरकारला विनंती आहे की दारूसाठी रांगा लावणाऱ्याचे रेशन कार्ड रद्द करण्यात यावे. त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या रेशनची गरज नाही. जर ते दारू खरेदी करू शकतात, तर धान्य देखील खरेदी करू शकतात. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाची लाज वाटते.

आपल्या आणखी एका ट्विटमध्ये जलील म्हणाले की, आम्ही उद्धवजींच्या कामाचे कौतूक करतो, मात्र हे सर्व वाया गेले आहे. रेड झोनमधील आमदार, खासदार जिवाशी का खेळत आहेत. कदाचित ते देखील बेवडे असतील.

मुंबईमध्ये दारूची दुकाने उघडल्यानंतर लॉकडाऊनच्या नियमांचे तीन तेरा वाजल्यावर सरकारने पुन्हा ही दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. यावर माझी दुकाने बंद ठेवण्याची भूमिका योग्य ठरल्याचे देखील जलील म्हणाले.

Leave a Comment