जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला असून, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. अनेकदा रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, तर अनेकदा उशिरा लक्षणे दिसतात. या समस्येवर उपाय म्हणून आता नॉर्थ वेस्टन यूनिव्हर्सिटी, शिकागो आणि शर्ली रयान एबिलिटी लॅबने एक खास स्टिकर तयार केला आहे. जो दिसायला काही प्रमाणात बँडएडप्रमाणे दिसत आहे. या स्टिकरला गळ्यावर चिटकवले जाते. यामध्ये अनेक सेन्सर्स लावण्यात आलेले आहेत. या स्टिकरला कोरोना सेंसर म्हटले जात आहे.
‘हा’ सेन्सर देणार कोरोनाच्या लक्षणांबाबत माहिती
हे सेन्सर कफ, श्वासांची गती, वायब्रेशनच्या आधारावर कोरोनाच्या लक्षणांबाबत माहिती देते. नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीचे प्रा. जॉन रोजर म्हणाले की, प्रायव्हेसी लक्षात घेऊन या स्टिकरमध्ये मायक्रोफोन लावण्यात आलेला नाही. यात हाय बँडविड्थ आणि ट्राय एक्सिस एक्सिलेरोमीटरचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून श्वास घेण्याचा पॅटर्न ट्रॅक करता येईल. हे सेन्सर हार्ट रेट आणि शरीराचे तापमान देखील मोजते. सेंसरच्या पुढील व्हर्जनमध्ये ऑक्सीजन मीटर देण्यात येणार आहे.
या सेन्सरचा उपयोग आतापर्यंत 25 लोकांवर करण्यात आलेला आहे. सेन्सरला एका वायरलेस चार्जरद्वारे चार्ज केले जाईल आणि डाटाला मोबाईल अॅपद्वारे शिंक केले जाईल. सेंसरमध्ये कोणताही पार्ट नसून, यात आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा देखील सपोर्ट मिळेल.