स्वीडन मध्ये सुरु होतेय खास करोना रेस्टॉरंट


फोटो साभार जागरण
जगभर हातपाय पसरलेल्या कोविड १९ मुळे हॉटेल व्यवसाय बंद पडले आहेत. कारण सोशल डीस्टन्सिंग मुळे एकत्र बसणे, खाणे पिणे यावर बंधने आली आहेत. व्यवसाय पुन्हा सुरु करता यावेत यासाठी अनेक रेस्टॉरंट मालक काही युक्त्या शोधत आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्वीडेन मध्ये एक अनोखे खास करोना स्पेशल रेस्टॉरंट १० मे पासून सुरु होत आहे. या रेस्टॉरंटचे नामकरण ‘ टेबल फॉर वन’ असे केले गेले आहे कारण येथे एका वेळी एकच ग्राहक येऊ शकणार आहे.

एका मोठ्या मैदानात त्यासाठी टेबल खुर्ची मांडली गेली असून या हॉटेल मध्ये वेटर असणार नाही. ग्राहक ज्या पदार्थाची ऑर्डर देईल ते त्याच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी एका दोरीला एक टोपली बांधली गेली आहे. या टोपलीतून पदार्थ ग्राहकाला सर्व केले जातील. ग्राहक एकटाच या पदार्थांचा आस्वाद मोकळ्या मैदानात बसून घेऊ शकेल. ग्राहकाने वापरलेली भांडी दोन वेळा धुतली जाणार आहेत आणि टेबल दोन वेळा सॅनिटाईज केले जाणार आहे असे मालक लिंडा चे म्हणणे आहे.

लिंडा सांगते येथे विविध पदार्थ मिळतील तशीच विविध ड्रिंक्सही सर्व्ह केली जातील. या नव्या कल्पनेमुळे येथे येणाऱ्यांना हे रेस्टॉरंट कोविड १९ फ्री आहे याची खात्री पटेल. आणि एकमात्र ग्राहक एका वेळी असल्याने त्याच्याकडे आम्ही पूर्ण लक्ष पुरवू शकणार आहोत.

स्वीडेनने करोनावर मात केल्याचे जाहीर केले गेले असले तरी येथे २२ हजार संक्रमित होते आणि २७६९ माणसे मृत्युमुखी पडली आहेत.

Leave a Comment