कोरोनावरील लसीसाठी जागतिक नेते देणार 60 हजार कोटी रुपये

जागतिक नेते आणि संघटनांनी कोव्हिड-19 साठी लस, उपचारासाठी संसाधन, निर्माण आणि वितरणासाठी 8 बिलियन डॉलर्स (जवळपास 60 हजार कोटी रुपये) देण्याचे वचन दिले आहे. मात्र अमेरिकेने या जागतिक स्तरावरील प्रयत्नात भाग घेण्यास नकार दिला. आयोजकांमध्ये यूरोपियन यूनियन, ब्रिटन, नॉर्वे, सौदी अरेबिया हे देश सहभाही होती. याशिवाय जपान, कॅनडा, दक्षिण अफ्रिका आणि इतर डझनभर देश व्हर्च्युल कार्यक्रमात सहभागी झाले होते. तर चीनकडून यूरोपियन संघातील त्यांचे राजदूत या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पुढील काही आठवडे अथवा महिने जागतिक बँक, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन व काही श्रींमताकडून निधी जमविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यूरोपियन कमिशनचे प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयेन हे ऑनलाईन कार्यक्रमानंतर म्हणाल्या की, अवघ्या काही तासांमध्येच आम्ही कोव्हिड-19 वरील लस, उपचारासाठी 8.1 बिलियन डॉलर्स देण्याचे वजन दिले. याद्वारे जागतिक सहकार्य सुरू करण्यास मदत होईल. पॉप सिंगर मोडोना देखील 1 मिलियन यूरो देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेने या कार्यक्रमात का भाग घेतला नाही, हे यूरोपियन यूनियनकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच व्हायरसवरील लस सर्वांसाठी उपलब्ध व्हावी. केवळ श्रींमत देशांसाठी नसावी, असेही अनेक देशांच्या प्रमुखांनी यावेळी म्हटले.

यूएनची संस्था असलेल्या ग्लोबल प्रिपर्डन्स मॉनिटरिंग बोर्डानुसार, 8 बिलियन डॉलर्सची त्वरित आवश्यकता आहे. यातील 3 बिलियन डॉलर्स कोरोनावरील लसीची निर्मिती, उत्पादन आणि वितरणासाठी खर्च करावे लागतील. 2.25 बिलियन डॉलर्स उपचारासाठी, 750 मिलियन डॉलर्स टेस्टिंग किट्स, 750 मिलियन डॉलर्स प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटसाठी आणि इतर 1.25 बिलियन डॉलर्स जागतिक आरोग्य संघटना सर्वाधिक नुकसान झालेल्या देशांमध्ये खर्च करेल.

Leave a Comment