Video; किरण मोरेच्या त्या उड्या मला भिक मागण्यासारखे वाटत होते


भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश कट्टर वैरी असल्याचे आपल्याला काही नव्याने सांगण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे राजकीय क्षेत्रात दोन्ही देश कधी आमने-सामने येतात तेव्हा जसा भडका उडतो तसाच भडका क्रिकेटच्या मैदानात देखील उडतो. दोन्ही देशातील क्रिकेट सामन्याला हाय व्होल्टेज असे देखील काहीवेळेस संबोधले जाते. त्याचबरोबर क्रिकेटच्या मैदानात जेव्हा केव्हा हे दोन्ही देश आमनेसामने येतात. तेव्हा दोन्ही देशांच्या खेळाडूंच्या वागणूकीत देखील बदल झालेला असतो. त्याचा प्रत्यय आपण अनेकादा सामन्यादरम्यान घेतला आहे. त्यातच पाकचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद आणि भारतीय संघातील खेळाडू यांचे किस्से प्रसिद्ध आहेत. जावेद मियाँदादने चेतन शर्माच्या अखेरच्या चेंडूवर षटकार मारून मिळवलेला विजय आज भारतीय विसरलेले नाहीत.

असाच एक दुसरा किस्सा आहे, ज्यात जावेद मियाँदादने भारतीय यष्टीरक्षक किरण मोरे यांना चिडवण्यासाठी मैदानात त्यांच्यासारख्या उड्या मारल्या होत्या. १९९२च्या विश्वचषक स्पर्धेत ४ मार्च रोजी सिडनी मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली होती. जेव्हा जावेद मियाँदाद फलंदाजीला आला तेव्हा त्याला बाद करण्यासाठी किरण मोरे पंचांकडे सातत्याने अपील करत होते. मियाँदादने तेव्हा मैदानातच किरण मोरे यांची नकल देखील केली होती. त्या घटनेचा व्हिडिओ खुप व्हायरल झाला होता.

१९९२च्या विश्वचषक स्पर्धेतील त्या घटनेवर बोलताना मियाँदाद म्हणाला, मी फलंदाजीला आल्यावर किरण वारंवार अपील करत होता. विकेटच्या मागून तो वारंवार कमेंट देखील करत होता. अशा प्रकारे एखाद्या फलंदाजाला त्रास देणे चुकीचे असते. जेव्हा भारताविरुद्ध मी फलंदाजीला जात होतो, तेव्हा त्यांची अवस्था खराब व्हायची.

मला बाद करण्याचा भारतीय खेळाडू नेहमी विचार करत असे. त्यामुळे माझ्या मागे ते लागत असत. त्यात किरण मला बाद करण्यासाठी अपील करताना नेहमी उड्या मारायचा. तेव्हा असे वाटत असे की तो अंपायरकडे अपील नव्हे तर भिक मागत आहे. भाई दे.. दे. म्हणून मी मुद्दाम त्याची नकल केली. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात आजवर पाकिस्तानी संघाला कधीच भारतावर विजय मिळवता आला नाही. भले १९९२चा विश्वचषक पाकिस्तानी संघाने जिंकला असला तरी भारताने या स्पर्धेत पाकचा ४३ धावांनी धुव्वा उडवला होता.

Leave a Comment