पाकिस्तानाच्या पंतप्रधानांनीही घेतला तबलिगींचा धसका


इस्लामाबाद : पाकिस्तानात देखील कोरोना व्हायरसने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मुस्लिमांचा पवित्र महिना अर्थात रमजान सुरु असल्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी मशिदींमध्ये सशर्त प्रार्थना करण्यास परवानगी दिल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत पाकिस्तानमधील 21 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 476 लोकांचा मृत्यू झाला आहे. असे असताना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात सुरु असलेला लॉकडाऊन हळुहळु हटवण्याची गरज असल्याचेही पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले. पाकमधील एक रिपोर्टनुसार, येथील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत 27% रुग्ण हे तबलिगींमुळे बाधित झाले आहेत.

यासंदर्भात ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानातील पंजाबमधील रायविंद शहरात 10 मार्च रोजी तबलिगी जमातच्या लोकांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता, सरकारी आकडेवारीनुसार ज्यामध्ये सुमारे 80 हजार लोकांचा सहभाग होता. पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार यातील 3 हजार लोक परदेशी होते आणि ते 40 वेगवेगळ्या देशांमधून आले होते. अमेरिका, इंग्लंड, फिलिपिन्स आणि बर्‍याच अरब देशांतील लोकही येथे आले. नंतर, संपूर्ण रायविंड शहर सील करावे लागले कारण ते इराणमधून आलेल्या यात्रेकरूनंतर पाकिस्तानमध्ये तबलिगी कोरोनाचा पसरवण्याचे सर्वात मोठे साधन मानले जात आहे.

या रिपोर्टनुसार, परदेशी नागरिकांचा या कार्यक्रमात सहभागी झालेले लोकांमध्ये जास्त समावेश होता. विमान प्रवास कोरोनामुळे बंद झाल्यामुळे पाकिस्तानात शेकडो लोक अडकले होते. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमातचे काही मोठे प्रचारक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यामुळे त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर, 40 हजारहून अधिक तबलिगींना सध्या क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर, 70 हजारहून अधिक तबलिगींचा शोध सुरू आहे. सिंध प्रांतानंतर पंजाबमध्ये कोरोनाचे सगळ्यात जास्त 7 हजार 646 रुग्ण आहेत. एकट्या रावळपिंडी शहरात 2 हजार 300 कोरोना रुग्ण आहेत, यातील सर्व तबलिगी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

दुसरीकडे ‘कोरोना रहाट टायगर फोर्स’ या कार्यक्रमात पाकिस्तानमध्ये अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन जाहीर केला जाऊ शकत नाही. येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने बंद हटवण्यात येईल. ‘कोरोना राहत टायगर फोर्स’ ही पाकिस्तानमधील एक युवा संघटना आहे, जी सरकारची मदत गरिबांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करेल. पाकिस्तानमधील लॉकडाऊन 9 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर काही प्रमाणात लॉकडाऊनचे नियम शिथील केले जाऊ शकतात.

Leave a Comment