जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 36 लाख 40 हजारांहून अधिक; अडीच लाख पार मृतांची संख्या


नवी दिल्ली : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोना व्हायरसचे थैमान सुरु असून जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे. मागील 24 तासांमध्ये कोरोनाचे 78377 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर 3,877 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जगभरात 36 लाख 42 हजार 066 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर यापैकी 2 लाख 52 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11 लाख 93 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

अमेरिकेमध्ये जगभरातील एकूण कोरोनाच्या रूग्णांपैकी एक तृतियांश रुग्ण आहेत. तर अमेरिकेमध्ये एक चतुर्थांश कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेन कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेला दुसरा देश आहे. तेथे 25,428 लोकांचा मृत्यू झाला असून 2,48,301 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मृतांच्या संख्येत इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर यूके तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 29,079 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोना बाधितांची संख्या 2,11,938 एवढी आहे. त्यानंतर यूके, फ्रान्स, जर्मनी, टर्की, इराण, चीन, रूस, ब्राझील, कॅनडा यांसारखे देश सर्वाधिक प्रभावित आहेत.

तसेच जर्मनी, रूस, ब्राझीलसह 9 देशांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येने एक लाखांचा आकडा पार केला आहे. 20 हजारांहून अधिक रुग्णांचा पाच देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटेन) यांसारख्या देशांमध्ये मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतांचा आकडा 70 हजारांजवळ पोहोचला आहे. टॉप-10 कोरोना बाधित देशांच्या यादीतून चीन बाहेर पडला आहे.

Leave a Comment