विना लॉकडाऊन स्वीडनने अशा प्रकारे रोखले कोरोनाचे संक्रमण

जगभरातील देश कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचा मार्ग निवड असताना, दुसरीकडे स्वीडनने नियमांमध्ये सूट देत वेगळा पर्याय निवडला आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना देखील येथे बाजार, बार, हॉटेल, शाळा आणि सार्वजनिक वाहतूक देखील सुरू आहे. स्वीडिश सरकारनुसार, प्रतिबंध लादण्याऐवजी दिर्घ काळ संक्रमणापासून वाचवू शकतील अशा नियमांवर जोर देण्यात आलेला आहे.

स्वीडनने 65 पेक्षा कमी वय असणाऱ्या नागरिकांना बाहेर पडण्यास सुट दिली आहे. तर 65 पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना घरात राहण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे बाहेर असणाऱ्या 60 टक्के लोकांमध्ये संक्रमण आपोआप थांबेल. कमी वयाच्या लोकांना संक्रमण झाले तर ते फ्लू सारखे असेल व गंभीर रुग्णांची संख्या कमी असेल. एवढ्या रुग्णांसाठी आयसीयू बेड आणि वेंटिलेटर पर्याप्त असतील.

नववी पर्यंतचे विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू आहे, जेणेकरून आई-वडील कामावर जाऊ शकतील. कॉलेज, हायस्कूल बंद आहेत. मात्र हॉटेल, किराना स्टोर आणि व्यापाराच्या जागा सुरू आहेत. 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. वृद्ध लोकांना सामान्य आजारासाठी हॉस्पिटलमध्ये न जाण्यास सांगण्यात आले आहे.

आकड्यांनुसार, येथील लोक स्वेच्छेने सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत आहे. सर्वेक्षण करणारी संस्था नोवूसनुसार, महिन्यापुर्वी 10 मधील 7 स्वीडिश नागरिक एकमेंकांमध्ये 1 किमीचे अंतर ठेवत चालत असे, ज्याची संख्या आता 9 झाली आहे.

Leave a Comment