या देशाच्या संरक्षण मंत्र्याने केला कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा

जगभरात सध्या कोरोनावरील लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अशातच इस्त्राईलचे संरक्षणमंत्री नफाताली बेन्नेट यांनी दावा केला आहे की त्यांच्या वैज्ञानिकांनी या महामारीवरील लस शोधली आहे. इस्त्रायलच्या ज्या अत्याधुनिक डिफेन्स बायोलॉजिकल इंस्टिट्यूटने ही लस बनवली आहे, ती आपल्या गुप्ततेसाठी जगभरात ओळखली जाते. हे इंस्टिट्यूट जगापासून लपवून जैविक आणि रासायनिक शस्त्रांची निर्मिती करते, असे सांगितले जाते.

या इंस्टिट्यूटची स्थापना 1995 ला तत्कालीन पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार अर्नेस्ट डेव्हिड बेर्गमान यांनी केली होती. इस्त्राईलमध्ये लस आणि औषध बनविण्याचा जबाबदारी देखील याच इंस्टिट्यूटकडे आहे.

इस्त्राईलच्या संरक्षणमंत्र्यांनुसार, ही लस मोनोक्लोनल पद्धतीने कोरोना व्हायरसवर हल्ला करते व रुग्णाच्या शरीराच्या आतच कोरोनाला नष्ट करते. हे इंस्टिट्यूट दक्षिण तेलअबीबपासून 20 किमीवर नेस जिओना येथे आहे. या इंस्टिट्यूट 350 लोक काम करतात, ज्यात 150 वैज्ञानिक आहे. याचा रिपोर्ट थेट पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना दिला जातो.

सांगण्यात येते की, ही लॅब जैविक आणि रासायनिक शस्त्र निर्माण करते व अशा हल्ल्यांपासून वाचण्यासाठी शस्त्रांची निर्मिती करते. ही इंस्टिट्यूट गुप्तहेर संस्था मोसादसाठी विष देखील बनवते. ही लॅब जमिनीत खोल आत आहे. या इंस्टिट्यूटच्या वरून विमानांना देखील उडण्यास परवानगी नाही. इंस्टिट्यूटच्या भिंतीवरती सेंसर आहेत. भिंत कोणी पार करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्वरित सुचना मिळते. विशेष म्हणजे या इंस्टिट्यूटचा कोणत्याही मॅपवर उल्लेख नाही. सुरक्षेचे विशेष नियम येथे पाळले जातात. येथे 6 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे सांगितले जाते, मात्र याचे कारण कोणालाच माहित नाही.

Leave a Comment