कोरोनाला रोखणार डिआरडीचा ‘डिसइंफेक्शन टॉवर’; होणार सार्वजनिक ठिकाणी वापर


नवी दिल्ली : सार्वजनिक ठिकाणांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया अधिक सक्षमपणे करण्यासाठी संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्यावतीने (डीआरडीओ) नवीन यंत्र विकसित करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसपासून मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, विमानतळ, शाळा आणि मेट्रो स्टेशन यांसारखी सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी अल्ट्रा व्हायलेट तंत्रज्ञानाने चालणारा एका डिसइंफेक्शन टॉवर (निर्जंतुकीकरण टॉवर) डीआरडीओने तयार केला आहे. वाय-फायवर चालणारा हा टॉवर अर्ध्या तासात 400 चौरस फूट क्षेत्र निर्जंतुकीकरण करु शकतो.

यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हे ‘यूव्ही -बलॉस्टर’ कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असलेल्या कोणत्याही मोठ्या क्षेत्रात केमिकलचा वापर टाळायचा असल्यास खूप प्रभावी आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल किंवा लॅपटॉप वरून वायफायद्वारे या यूव्ही (अल्ट्रा व्हायलेट) बलॉस्टरला दूरुन देखील हाताळता येऊ शकते. सहा यूव्ही-सी लॅम्प या मशीनला लावले आहेत. 43 वोल्ट्सचा प्रत्येक लॅम्प असून 360 डिग्री प्रकाश देतो. एक मशीन 12×12 फूट रुमला 10 मिनिटांत कोरोना विषाणूमुक्त करु शकते, असा दावा डीआरडीओने केला आहे.

संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्यावतीने (डीआरडीओ) गुरुग्राम येथील एका खासगी कंपनीच्या मदतीने या डिसइंफेक्शन टॉवर (निर्जंतुकीकरण टॉवर) ला तयार केले आहे. ‘यूव्ही-बलॉस्टर’ मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, विमानतळ, शाळा आणि मेट्रो स्टेशन यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी खूप मदत करु शकतो. तसेच या टॉवरचा कम्प्युटर आणि इतर हाय-टेक उपकरणे असलेली कार्यालये आणि लॅब अशा ठिकाणी देखील उपयोग केला जाऊ शकतो.

Leave a Comment