कोरोना प्रतिबंधक लस बनू नये यासाठी चीनची आडकाठी; 5 देशांचा गौप्यस्फोट


बीजिंग: जगभरातील 212 देशांमध्ये चीनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून अनेक देश सध्या चीनकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. त्याचबरोबर अमेरिकेकडून वारंवार कोरोना व्हायरस हा चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतच तयार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच जगभरात कोरोनाचा संसर्ग पसरेपर्यंत चीनने त्याची कुठेही वाच्यता न केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चीनबद्दल बरीच नाराजी आहे.

त्यातच जगभरातील बरेच देश आता कोरोना प्रतिबंधक लस बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यात चीन अडथळे आणत असल्याचा दावा पाच देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. कोरोना प्रतिबंधक लस बनवण्यात चीन अडथळे निर्माण करत असल्याचा दावा अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील गुप्तचर यंत्रणांच्या संबंधित हेरांनी केला आहे.

यासंदर्भात द सनने दिलेल्या एका वृत्तानुसार, 15 पानांचे एक डॉसियर या पाच देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी संयुक्तपणे तयार केले आहे. लवकरात लवकर जगाला कोरोना प्रतिबंधक लस मिळावी, अशी चीनची इच्छा नाही. अनेक देश आणि स्वतंत्र वैज्ञानिक संस्थांना कोरोनाचे थेट नमुने देण्यास चीनने नकार दिला आहे. तसेच इतर देशातील वैज्ञानिकांना ग्राऊंड झिरोवर जाण्याची किंवा घटनास्थळाला भेट देण्याची परवानगी दिली नसल्याचा दावासुद्धा या डॉसियरच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

15 पानांच्या अहवालात पाच देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी काय दावा केला आहे ?
चीनने वारंवार कोरोनाचा व्हायरस मनुष्यापासून मनुष्यामध्ये पसरला असल्याचे फेटाळले आहे. चीनला याची बऱ्याच काळापासून जाणीव असल्याचे ठाम पुरावेही समोर आले असून ही गोष्ट मान्य करण्यासाठी चीनने तब्बल एक आठवड्याचा काळ घालवला, तोपर्यंत कोरोनाने युरोप आणि अमेरिकेत हातपाय पसरलेले होते.

कोरोना विषाणूची माहिती देण्याचा आणि त्याच्या धोक्यांविषयी सांगण्याचा चीनमधील ज्या डॉक्टर किंवा पत्रकारांनी प्रयत्न केला ते अचानकच गायब झाले आहेत. वटवाघळांमध्ये सापडलेल्या हानिकारक विषाणूंवर वुहानमधील प्रयोगशाळेत संशोधन चालू असल्याचे पुरावे मिळाले आहेत. कोणत्याही संरक्षणाचा उपकरणांचा वापर या प्रयोगशाळेतील संशोधनादरम्यान केला जात नव्हता. त्याचे फोटोसुद्धा समोर आले होते, पण ते फोटो आता चीनने हटवले आहेत.

वुहानमधील ती प्रयोगशाळ देखील चीनने नष्ट केली नाही, तर त्यात काम करणारे संशोधक देखील गायब केले आहेत. कोरोना विषाणूचे थेट नमुने जगभरातील शास्त्रज्ञांना पाठविण्यास चीन सतत नकार देत असल्यामुळे लस विकसित करण्याची गती आणखी मंदावली आहे. कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात चीनने कठोरपणे आपल्या देशात प्रवासी बंदी लागू केली, परंतु इतर देशांना सांगितले की, ही केवळ खबरदारी आहे, प्रत्येकाने तसे करण्याची गरज नाही.

या अहवालात पुढे असे म्हटले आहे की, डिसेंबरमध्येच विषाणूची पूर्ण बीजिंगला माहिती होती, परंतु अधिकृतपणे माहिती 31 डिसेंबरला प्रसिद्ध केली. चीनला कोरोना मनुष्यातून मनुष्यामध्ये संक्रमित होतो हे सांगण्यास 20 दिवस लागले, तोपर्यंत केवळ वुहानमधील 25 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झालेली होती. वुहानमधून जगातील कित्येक देशांमध्ये 23 जानेवारीपासून काही लाख लोकांनी प्रवास केला आहे, त्यानंतर संबंधित देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढू लागली, असे चीनच्या अधिकृत कागदपत्रांवरून समोर आले आहे. या व्यतिरिक्त चीन सरकारने कोरोनाविषयी माहिती देणारे व्हिसलब्लोअर आणि डॉक्टर बेपत्ता होण्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Leave a Comment