देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात ३ हजार ९०० नव्या रुग्णांची भर, संख्या ४६ हजार ४०० च्याही पुढे


नवी दिल्ली – गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे ३ हजार ९०० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४६ हजार ४३३ एवढा झाला आहे. गेल्या २४ तासात देशभरात १९५ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. मागील २४ तासांमध्ये देशात १ हजार २० लोक कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशभरात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १२ हजार ७२६ झाल्याचेही त्यांनी नियमित पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Leave a Comment