पोलिसांनी सपना चौधरीच्या गाण्यावर करायला लावला डान्स, व्हिडीओ व्हायरल

लॉकडाऊनच्या काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांना पोलीस वेगवेगळ्या शिक्षा देत असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोठे उठाबशा काढण्याची शिक्षा दिली जात आहे तर कोठे आरती ओवाळली जात आहे. असाच उत्तर प्रदेशमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र लॉकडाऊनचे पालन न केल्यामुळे दिलेली शिक्षा पोलिसांनाच महागात पडली आहे.

उत्तर प्रदेशमधील इटावा येथील पोलिसांनी कथितरित्या लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने तरूणाला ‘तेरी आख्या का यो काजल…’ या गाण्यावर डान्स करायला सांगितला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची खास गोष्ट म्हणजे तरूण अगदी जोशात डान्स करत आहे व पोलीस देखील मागून ओरडून त्याला प्रोत्साहन देत आहेत.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना या अशा शिक्षेवर टीका केली आहे. पोलिसांनी आपल्या ताकदीचा गैरवापर केल्याचे देखील अनेकांना म्हटले आहे. याविरोधात कारवाई करत स्टेशनच्या प्रभारी पोलीसला निलंबित करण्यात आले असून, पोलीस लाईनमध्ये पाठवण्यात आले आहे.

Leave a Comment