जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 35 लाख पार; तर 2 लाख 48 हजार मृत्यू


मुंबई : जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर कायम असून जगभरात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 35 लाख 65 हजार 310 वर पोहोचली आहे. तर जगभरात आतापर्यंत 2 लाख 48 हजार 565 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या व्हायरसपासून जगभरात 11 लाख 54 हजार रुग्ण बरे झाले आहेत.

अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून जगाच्या तुलनेत एकट्या अमेरिकेत कोरोना व्हायरसचे 35 टक्के रुग्ण आहेत. ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत अमेरिकेत 11 लाख 88 हजार 112 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 68 हजार 598 लोकांचा यात मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेतील 78 हजार 263 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

अमेरिकेनंतर कोरोनाचा जास्त परिणाम स्पेनमध्ये पाहायला मिळतो आहे. स्पेनमधील 2 लाख 47 हजार 122 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 25 हजार 264 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेननंतर कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 28 हजार 844 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 10 हजार 717 एवढा आहे. जगातील अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन हे पाच देश असे आहेत जिथे कोरोनामुळे 20 हजाराहून अधिक बळी गेले आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 60 हजारांहून अधिक बळी गेले आहेत.

Leave a Comment