घरातच लग्न करणाऱ्या जोडप्याला नाशिक पोलिसांनी अशा पद्धतीने दिल्या शुभेच्छा

लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद असल्याने अनेक लग्न पुढे ढकलण्यात आली, तर काहींनी घरातील मंडळींच्या उपस्थितीत लग्न उरकून घेतले. कोरोना व्हायरस महामारीच्या काळात अशा प्रकारचे घरातच लग्न केलेल्या नवविवाहित जोडप्याला पोलिसांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.

इंस्टाग्रामवर सीएमओ महाराष्ट्राच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शन लिहिले की, लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून घरातल्या घरात लग्न करणाऱ्या जोडप्याला नाशिक पोलिसांनी अनोख्या शैलीत दिल्या शुभेच्छा!

https://www.instagram.com/tv/B_sBGqdJLG5/?utm_source=ig_web_copy_link

जवळपास 2 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पोलीस नवविवाहित जोडप्याला लॉउडस्पिकरद्वारे शुभेच्छा देत आहेत. तर जोडपे बाल्कनीमध्ये उभे आहे. यानंतर पोलिस या जोडप्यासाठी बॉलिवूड चित्रपटातील गाणी लावत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात.

या जोडप्याने लॉकडाऊनचे नियम पाळत, घरातल्या घरात लग्न केल्याने पोलिसांकडून त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Comment