लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात आजपासून कुठे मिळणार सूट आणि कुठे बंदी कायम


मुंबई : देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 हजारांवर गेला असून देशभरातील लॉकडाऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 17 मेपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा अंमलबजावणी सुरू झाली आहे. या तिसऱ्या टप्प्यात काही ठिकाणी नियम शिथिल कऱण्यात आले आहेत. याबाबत पत्रक काढून केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. वेगवेगळे नियम रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन संदर्भात करण्यात आले असून रेड झोनसाठी अतिशय कमी तर ग्रीन झोनसाठी सर्वात जास्त मोकळीक देण्यात आली आहे. केंद्र सरकारने याबाबत गाइडलाइन दिली असली तरी त्यात सुधारणा करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. स्थानिक गरजा लक्षात घेऊन त्यात बदल करण्याचा अधिकार स्थानिक सरकारला असणार आहे. अत्यावश्यक सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.

आजपासून काय बंद राहणार?

  • रेल्वे सेवा, हवाई वाहतूक, मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक 17 मेपर्यंत बंद राहणार
  • सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेजेस 17 मेपर्यंत बंद राहणार
  • मॉल, सिनेमा हॉल, स्पोर्ट्स क्लब बंद 17 मेर्यंत बंद राहणार

ग्रीन झोनमध्ये काय खुले राहणार ?

  • ग्रीन झोनमध्ये 50 टक्के क्षमतेनेच प्रवासी वाहतूक सुरू राहणार
  • बस डेपोमध्ये 50 टक्केच कर्मचारी काम करणार
  • ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये शहरांतर्गत गावांतर्गत व्यवहार सुरू होतील मात्र एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.

इतर झोनमध्ये काय खुले राहणार ?

  • महाराष्ट्रातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दुकाने उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कंटेनमेंट किंवा हॉटस्पॉट झोनमध्ये दुकाने उघडणार नाहीत.
  • एमएमआर आणि पीएमआर भागातील दुकाने काही अटींसह उघडली जाणार आहेत. मॉल आणि प्लाझामधील दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही.
  • प्रत्येक लेनमध्ये वस्तूंची केवळ 5 दुकाने उघडली जातील. आवश्यक स्टोअरसाठी संख्या निश्चित केलेली नाही. दारूची दुकाने खुली राहतील.
  • कंटेनमेंट झोन वगळता दारूची दुकानं सुरू कऱण्याची परवानगी देण्यात आली आहेत.

Leave a Comment