परराज्यात अडकले असल्यास घरी जाण्यासाठी येथे करा रजिस्ट्रेशन

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये आता सरकारने काही प्रमाणात सूट दिली आहे. काही दुकाने देखील सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. सोबतच परराज्यात अडकलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी स्पेशल रेल्वे सुरू करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. राज्य सरकार एकमेकांमध्ये चर्चा करत रेल्वे मंत्रालयाला स्पेशल रेल्वे चालविण्याची शिफारस करू शकतात.

अनेक राज्य सरकारने प्रवाशांच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे काम सुरू केले आहे. आकडेवारी गोळा करून कोणत्या राज्यात किती रेल्वे जातील, हे सरकार निश्चित करेल. या रेल्वे मधल्या कोणत्याही स्टेशनमध्ये थांबणार नाही. या प्रवाशांना 15 ते 21 दिवस सरकार क्वारंटाईनमध्ये ठेवेल.

येथे करा रजिस्ट्रेशन –

दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की लोकांना येण्या-जाण्यासाठी दिलेली सूट ही केवळ प्रवासी कामगार, अडकलेले पर्यटक, भाविक आणि विद्यार्थ्यांसाठी आहे.

Leave a Comment