यंदाच्या आषाढी पालखी सोहळ्याबाबत अनिश्चितता


फोटो साभार युट्यूब
शतकानुशतके आषाढ वारी साठी लाखो वारकरी आळंदी देहू पासून पंढरपूरच्या विठू दर्शनाला संत ज्ञानोबा आणि संत तुकोबांच्या संगतीने जात असतात मात्र यंदा करोनामुळे आषाढी पालखी सोहळा होणार का नाही या बाबत अनिश्चितता निर्माण झाल्याचे समजते. या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज संस्थानाने दिंडी प्रमुख आणि मानकऱ्याना पत्र पाठवून सूचना मागविल्याचे समजते. अर्थात या संदर्भातला निर्णय दोन्ही म्हणजे ज्ञानोबा आणि तुकोबा महाराज संस्थान एकत्रितपणे घेणार असल्याचेही सांगितले जात आहे.

काही दिंडी प्रमुखांनी या बाबत सूचना केल्या असून वारीत खंड पडता कामा नये यासाठी निवडक १० व्यक्तींनी पालखी ट्रक मधून थेट पंढरपूर येथे न्यावी असा विचार मांडला आहे. यात सोहळा मालक एक व्यक्ती, १ वारकरी, एक सेवक, एक चोपदार, माउलीचे दोन पुजारी, संस्थानचे दोन विश्वस्त याचा समावेश करावा आणि ३० जून रोजी पालखी मंदिरातून बाहेर पडल्यावर पहिला मुक्काम झाला की तेथून ट्रक मधून थेट पंढरपूर क्षेत्री न्यावी असे सुचविले आहे.

Leave a Comment