खराब आहार कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचे कारण असून, कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी भारतीयांनी अती प्रक्रिया (अल्ट्रा प्रोसेस्ड) केलेले पॉकीट बंद अन्न खाणे कमी करावे, असे मूळ भारतीय वंशांचे ब्रिटनमधील कार्डियोलॉजिस्ट यांनी म्हटले आहे.
कोरोना : खराब आहार भारतीयांच्या मृत्यूस कारणीभूत – ब्रिटन डॉक्टर
ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेत कार्यरत असलेले डॉक्टर असीम मल्होत्रा म्हणाले की, लठ्ठपणा हे कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचे मोठे कारण असून, यावर उपाय करण्याची गरज आहे.
मल्होत्रा म्हणाले की, भारतात वेगळ्या जीवनशैलीमुळे विविध आजार आहेत. खासकरून टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयाची समस्या यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा धोका वाढतो. लठ्ठपणा आणि मेटाबोलिज्म संबंधी आजार यामागचे कारण आहे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. याचे कारण अस्वस्थ जीवनशैली हे असू शकते. निरोगी वजन असे काहीही नसते. केवळ निरोगी व्यक्ती असतो. निरोगी जीवनशैलीद्वारे लोक मेटाबोलिकवर नियंत्रण मिळवू शकतात. यासाठी आहारात बदल करावा लागेल.
नेचर सायन्स जर्नलनुसार, टाईप 2 मधुमेह आणि मेटाबोलिज्म संबंधीत आजार असणाऱ्या रुग्णांची कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 10 पट अधिक आहे.
मल्होत्रा यांच्यानुसार, जीवनशैलीतील बदलाचा आरोग्यवर चांगला परिणाम होतो व औषधांचाही अधिक वापर करावा लागत नाही. भारतीयांच्या आहारत रिफाइंड कार्बोहायड्रेड पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. हे पदार्थ धोकादायक असून, यामुळे ग्लुकोझ आणि इंसुलिन वाढवते. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि ह्रदयाची समस्या निर्माण होते. यात धान्याचे पीठ आणि भाताचा देखील समावेश आहे. पाले भाज्या आणि फळांद्वारे हा आहार बदलता येतो. तसेच मांसाहारी लोक दुधाचे पदार्थ, मटन, अंडी, मासे इत्यादी खाऊ शकतात.