लाखो रिलायन्स जिओ युजर्सचा डेटा लीक

कोरोना व्हायरसची लक्षणे जाणून घेण्यासाठी रिलायन्स जिओने मागील मार्च महिन्यात एक टूल लाँच केले होते. या टूलच्या मदतीने कोरोनाची लागण झाली आहे की नाही, याची माहिती युजर्स मिळवू शकत होते. मात्र रिपोर्टनुसार, युजर्सच्या कोव्हिड-19 टेस्ट रिझल्टची माहिती असणारा डेटाबेस ऑनलाईन लीक झाला आहे. खास गोष्ट म्हणजे हा डेटाबेस विना पासवर्ड पाहता येत आहे.

टेकक्रंचच्या रिपोर्टनुसार, टूलच्या सिक्युरिटीच्या डेटाबेसमध्ये सुरक्षा त्रुटी असल्याने युजर्सचे रिझल्ट इंटरनेटवर विना पासवर्ड अपलोड झाले आहेत. सर्वात प्रथम सिक्युरिटी रिसर्चर अनुराग सेन यांच्या निदर्शनास ही बाब आली. रिलायन्स जिओने यानंतर त्वरित डेटाबेसला ऑफलाईन केले आणि त्यानंतर बगबाबत माहिती दिली.

रिपोर्टनुसार, डेटाबेसमध्ये लाखो रेकॉर्ड्स होते. स्वतःची टेस्ट करण्यासाठी साइनअप करणाऱ्यांचे यात रेकॉर्ड्स होते. या रेकॉर्डमध्ये त्या सर्व प्रश्नांची उत्तरे होते, जी टूलने युजर्सला विचारली. यात युजरचे लक्षण, आरोग्याची स्थिती आणि त्यांच्या संपर्कात आलेले असे सर्व प्रश्न आहेत. काही रेकॉर्ड्समध्ये लोकेशनचा देखील समावेश होतो. खासकरून मुंबई आणि पुण्यातील युजर्सचे लोकेशन होते.

रिलायन्सने जिओने यावर म्हटले की, आम्ही त्वरित कारवाई केली. हा लॉगिंग सर्व्हर आमच्या वेबसाईटच्या परफॉर्मेंसला मॉनिटर करण्यासाठी होता. याचा उद्देश केवळ त्या युजर्ससाठी होता, जे स्वतःमध्ये कोरोनाची लक्षण आहेत की नाही याची तपासणी करत होते.

Leave a Comment