शरीरात अनेक महिने राहू शकतो कोरोना, असंख्य प्रकरण आली समोर

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, याच्या विळख्यात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या व्हायरसबाबत नवनवीन माहिती देखील समोर येत आहे. कोरोना व्हायरस हा मनुष्याच्या शरीरात अपेक्षेपेक्षा जास्त दिवस राहत असल्याचे समोर आले आहे. अशी अनेक प्रकरण समोर आली आहेत.

42 वर्षीय चार्ल्स पिगनल यांना 4 मार्चला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. हॉस्पिटलमध्ये दोन दिवस त्यांनी खोकला व ताप काहीही नव्हते. मात्र 5 आठवड्यानंतर कोणतेही लक्षण नसताना त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या संदर्भातील वृत्त अमर उजालाने दिले आहे.

पिगनल यांच्या सारखे अनेक प्रकरण जगभरात आढळत असून, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यामुळे हैराण आहेत. रुग्णाला दुसरा कोणताही आजार नसताना, अखेर त्यांच्या शरीरातील व्हायरस नष्ट का होत नाही ? याबाबत डॉक्टर चिंतेत आहेत.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियामधील अभ्यासामध्ये समोर आले की कोरोनातून बरे झाल्यानंतर देखील शरीरात व्हायरसचे मृत तुकडे अनेक महिने राहतात.

रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्रानुसार, जेव्हा रुग्णाला 72 तास ताप येत नाही. याशिवाय श्वसन समस्येमध्ये सुधारणा आणि 24 तासांच्या आत त्यांचे दोन रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यास, रुग्ण कोरोना व्हायरस आजारातून बरा झाल्याची पुष्टी केली जाते.

Leave a Comment