दिलासादायक…! जगभरातील 11 लाखांहून अधिक लोकांची कोरोनावर मात


मुंबई : जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरु असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जगभरातील 11 लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्याचबरोबर जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा 2 लाख 44 हजारांवर पोहोचला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार 34 लाख 80 हजार 492 हजारांवर कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या पोहोचली आहे. तर जगभरातील 11 लाख 8 हजार कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. मागील 24 तासात 82,398 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर 5,162 जणांचा मृत्यू झाला आहे.

जगात अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. 11,60,774 जणांना अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत 67,444 लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनामुळे 25,100 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर स्पेनमधील 2,45,567 लोकांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 28,710 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,09,328 वर पोहचला आहे. जगातील अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन हे पाच देश असे आहेत जिथे कोरोनामुळे 20 हजाराहून अधिक बळी गेले आहेत. एकट्या अमेरिकेत कोरोनाचे 60 हजारांहून अधिक बळी गेले आहेत.

Leave a Comment