मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री या बंगल्याबाहेरील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाध झाली आहे. मागील काही दिवसांपासून हे पोलीस कर्मचारी येथे कार्यरत आहेत. मातोश्री परिसरातील चहावाल्याला याआधी कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह तीन पोलिसांवर सध्या उपचार सुरु आहेत. कोणतीही लक्षणे पॉझिटिव्ह आढळलेल्या या पोलिसांमध्ये दिसून येत नसल्यामुळे कला नगर भागातील सगळ्या पोलिसांची खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येत आहे. याआधी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये सगळ्या पोलिसांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती.
मातोश्रीबाहेर तैनात असलेले तीन पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त
दरम्यान शुक्रवारी मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ हजार ६०० च्या पुढे गेली आहे. तर एकट्या मुंबईत आत्तापर्यंत २९५ जणांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वतोपरी काळजी घेण्यात येते आहे. सोशल डिस्टन्सिंग, कोरोना प्रतिबंधित क्षेत्र, कोरोनाशी संबंधित चाचण्या वाढवणे हे या सर्व उपाययोजन राज्य सरकारकडून राबवण्यात येत आहे. तरी देखील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात वाढ होत आहे. यावर सरकार आणि मुंबई महापालिका सर्वतोपरी उपाय योजण्याचे प्रयत्न करत आहे.