नारायण मुर्तींच्या ‘त्या’ वक्तव्यावर संतापले नेटकरी


नवी दिल्ली – इकनॉमिक्स टाइम्सने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी बोलताना देशातील सध्याची परिस्थिती आणि एकूण कोरोनानंतरची परिस्थिती यावर भाष्य केले. अगदी लॉकडाउनपासून ते बेरोजगारीपर्यंत अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केले. पण त्याचबरोबर त्यांनी कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामधून सावरण्यासाठी भारतीयांनी पुढील दोन ते तीन वर्षे दिवसाला दहा तास याप्रमाणे आठवड्यातून सहा दिवस काम करण्याची शपथ घेतली पाहिजे, असेही मत व्यक्त मांडले आहे. त्याचबरोबर भारतीयांनी पुढील काही महिने तरी कोरोना हा इतर आजारांप्रमाणे असल्याचे समजून जगण्यास सुरुवात केली पाहिजे, असे मत, मुर्ती यांनी व्यक्त केले आहे. मुर्ती यांच्या या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांमध्ये नव्या चर्चेचा सुरुवात झाली आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेला कोरोनामुळे जो फटका बसाल आहे, त्या धक्क्यातून सावरण्यासाठी भारतीयांना आता आधिक काळ आणि अधिक कष्टाने काम करण्याची गरज असल्याचे मत मुर्ती यांनी व्यक्त केले. दिवसाचे दहा तास याप्रमाणे आपण सर्वांनी आठवड्यातून सहा दिवस काम करण्याची शपथ घेतली पाहिजे. या पद्धतीने पुढील दोन ते तीन वर्ष काम केल्यास आपण भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा फास्ट ट्रॅकवर आणू शकतो, असे मुर्ती यांनी म्हटले आहे.

अर्थव्यवस्था १९९१ साली खुली करण्यात आली, आताही त्याप्रमाणे सरकारनेही उद्योगांमध्ये अडथळा आणणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी एका तज्ज्ञांच्या समितीची स्थापना केली पाहिजे, अशी इच्छाही मुर्ती यांनी बोलून दाखवली. आपण या गोष्टी केल्या तर आपण अधिक सक्षमपणे या अडचणीमधून बाहेर येऊ असा विश्वासही मुर्ती यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पण मुर्ती यांच्या या व्यक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment