लॉकडाउनमुळे अ‍ॅमेझॉनला तब्बल ७ हजार ५०० कोटींचा फटका


नवी दिल्ली – जगभरातील बहुतांश देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक देशांध्ये खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. पण ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनला या लॉकडाउनमुळे मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

अ‍ॅमेझॉनचा नफा मार्च तिमाहित २९ टक्क्यांनी कमी होऊन, तो २५४ कोटी डॉलर्स एवढा झाला आहे. अ‍ॅमेझॉनला गेल्या वर्षी याच तिमाहित ३५६ कोटी डॉलर्सचा नफा झाला होता. पण त्यांना यावेळी तब्बल १०२ कोटी डॉलर्स म्हणजेच अंदाजे ७ हजार ५०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत कंपनीला आपल्या सेवेवर अधिक खर्च करावा लागला. तर काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंना वगळून अन्य वस्तूंच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आल्यामुळेच नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीच्या शेअर्समध्येही मार्च महिन्यात पाच टक्क्यांची घट झाल्याचे पाहायला मिळाले होते.

Leave a Comment