नवी दिल्ली – जगभरातील 212 देशांमध्ये कोरोना व्हायरसचा हाहाकार कायम असल्यामुळे या जीवघेण्या व्हायसरमुळे जगभरातील तब्बल 2 लाख 39 हजारांपेक्षा जास्त लोकांनी आपले जीव गमावले आहेत. मागील 24 तासांत जगभरात 94,552 नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. तर जगभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5,624 वाढला आहे. यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार, जगभरातील 33 लाख 98 हजार 473 लोकांचा आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असून यामुळे आतापर्यंत 2 लाख 39 हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 10,80,101 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
जगभरात कोरोनाचा हाहाकार कायम; 2 लाख 39 हजारांहून अधिकांचा मृत्यू
जगभरात कोरोनामुळे बळी गेलेल्या मृतांच्या एकूण आकड्यापैकी जवळपास एक तृतियांश रूग्ण अमेरिकेमध्ये आढळून आले आहेत. तर अमेरिकेत जवळपास एक चतुर्थांश मृत्यू झाले आहेत. अमेरिकेनंतर कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेला स्पेन हा दुसरा देश आहे. जिथे 24,824 लोकांचा मृत्यू झाला असून एकूण 242988 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मृतांच्या संख्येत इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 28236 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 207,428 वर पोहोचली आहे. यानंतर फ्रान्स, जर्मनी, युके, टर्की, इराण, चीन, रूस, ब्राझील, कॅनडा यांसारखे देशा जास्त प्रभावित झाले आहेत.