ई-कॉमर्स कंपन्यांना अनावश्यक सामानांची डिलिव्हरी करण्याची परवानगी


नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने देशात सुरु असलेला लॉकडाउन अजून दोन आठवड्यांसाठी वाढवला असून 4 मे ते 17 मेपर्यंत लॉकडाउनचा तिसरा टप्पा असेल. या लॉकडाउनमध्ये एक दिलासा देणारे वृत्त समोर येत आहे. ते म्हणजे, अत्यावश्यक नसलेल्या सामानांचीही डिलिव्हरी अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्या करु शकणार आहेत.

केंद्र सरकारकडून अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना अनावश्यक सामानांची डिलिव्हरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण, केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्येच ही परवानगी असेल. रेड झोनसाठी अद्यापही परवानगी देण्यात न आल्यामुळे रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सामानांचीच डिलिव्हरी केली जाईल.

केंद्र सरकारच्या परवानगीनुसार, ४ मेपासून आता ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नागरिक इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन स्मार्टफोन, लॅपटॉप, एसी, फ्रिज, कंप्यूटर हार्डवेअर यासारखी अत्यावश्यक नसलेली पण गरजेच्या सर्व वस्तू खरेदी करु शकणार आहेत. त्याचबरोबर ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ओला, उबेरसह खासगी टॅक्सी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. पण यावेळी चालकासह केवळ २ जणांनाच प्रवास करता येईल. हा नियम खासगी चारचाकीसाठीही कायम असेल.

Leave a Comment