कोरोना : गुजरातमध्ये टाळेबंदी करायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला

कोरोना व्हायरस महामारीशी लढण्यासाठी सर्वात पुढे असलेल्या आरोग्य कर्मचारी, पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत. अशीच घटना गुजरात येथील गोध्रा येथून समोर आली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भाग सील करायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. या घटनेत एक पोलीस  अधिकारी जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झहूर मार्केट येथील गुह्या मोहल्ला येथील नागरिकांनी दगडफेक केली. या घटनेत पोलीस अधिकारी पांड्या यांच्या डोक्याला इजा झाली. पोलिसांनी टियर गॅसच्या गोळ्यांचा मारा करत परिस्थिती नियंत्रण मिळवले. अद्याप या प्रकरणातत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान, गोध्रा शहरात आतापर्यंत 22 कोरोनाग्रस्त आढळले आहेत.

Leave a Comment