दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या रामायण मालिकेची विश्वविक्रमाला गवसणी


कोरोनामुळे देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेला सरकारने दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित केले. या मालिकेने आता विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. राष्ट्रीय वाहिनीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून आलेल्या ट्विटनुसार, रामायण रीब्रोडकास्टने जगभरातील प्रेक्षकांचा विक्रम तोडला आहे आणि 16 एप्रिल रोजी 7.7 कोटी दर्शकांसह जगात सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका बनली आहे.

देशभरातील लोक सध्या कोरोनामुळे आपल्या घरामध्ये बंद आहेत. कोणत्याही मालिकेचे कोणतेही नवीन भाग टीव्हीवर प्रसारित होत नाहीत, कारण टीव्ही मालिका, चित्रपट आणि वेब मालिकेचे शूटिंग 17 मार्चपासून बंद झाले आहे. याशिवाय रामायण पुन्हा प्रसारित करावे अशी लोकांकडून बर्‍याच काळापासून मागणी होती. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने लॉकडाउन काळात रामायण पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.

रामायण आणि महाभारत यासारख्या पौराणिक मालिकांना लोक पसंत करत आहेत. त्याचे भाग आणि देखावे सोशल मीडियावर दररोज चर्चेत असतात. रामायण पुनःप्रसारित झाल्यामुळे पुन्हा एकदा अरुण गोविल, दीपिका चिखलिया, सुनील लाहिरी आणि अरविंद त्रिवेदी या मालिकेतील मुख्य पात्रांना चर्चेत आणले आहे. लोकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे आणि प्रतिक्रियेमुळे ते खूप उत्साही आहेत.

ज्या दिवशी रामायणचा पहिला भाग प्रसारित झाला त्या दिवशी 17 दशलक्ष (एक कोटी 70 लाख) लोकांनी पाहिले. बुनियाद, शक्तीमान, श्रीमान श्रीमती आणि देख भाई देख यासारख्या अन्य प्रसिद्ध मालिका टीआरपीच्या दृष्टीनेही चांगली कामगिरी करत आहेत. खासगी वाहिन्यांविषयी बोलायचे झाले तर ते प्रेक्षकांना जुन्या मालिका दाखवत आहेत.

Leave a Comment