केंद्रीय कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे बंधनकारक

केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सुचना दिली आहे. सोबतच जर अ‍ॅपमध्ये सुरक्षित दाखवत असल्यास कामावर येण्यास देखील सांगितले आहे. या संदर्भात कार्मिक मंत्रालयाने आदेश दिले आहेत.

मंत्रालयाने म्हटले आहे की, ऑफिसला येण्यास सुरूवात करण्यापुर्वी कर्मचाऱ्यांनी आरोग्य अ‍ॅप पाहावे. जर त्यात ‘सुरक्षित’ अथवा ‘कमी धोका’ दाखवत असेल, तरच कामावर यावे.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जर अ‍ॅपमध्ये ‘मॉडेरेट’ अथवा ‘हाय रिस्क’ दाखवत असल्यास त्यांनी कार्यालयात न येता, 14 दिवस स्वतःला आयसोलेट करावे. जोपर्यंत ‘सेफ’ अथवा ‘लो रिस्क’ असा मेसेज अ‍ॅपवर येत नाही. तोपर्यंत असे करावे. सोबतच मंत्रालयाने सर्व विभागाने सुचना देत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारच्या सर्व विभागांना डेप्यूटी सेक्रेटरी पदाखालील केवळ एक तृतियांश कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Comment