कोरोनापासून पुरूषांना वाचवणार महिलांचे सेक्स हार्मोन !

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरूषांना सर्वाधिक कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. महिला कोरोनाचा सामना करत असून त्यावर मात देखील करत आहे. याबाबतचा अभ्यास केल्यावर वैज्ञानिकांना आढळून आले की महिलांच्या शरीरात आढळणाऱ्या सॅक्सच्युल हार्मोंसमुळे त्यांचे इम्युन सिस्टम अधिक प्रभावी राहते.

महिलांच्या सेक्स हार्मोंसद्वारे पुरूषांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणाशी लढण्यास मदत मिळू शकते का ?, याचा अभ्यास आता वैज्ञानिक करत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये 75 टक्के प्रमाण पुरूषांचे आहे. यामागचे कारण पुरूषांची लाईफस्टाईल आणि त्यांचा प्रदुषणाशी होणार सामना हे आहे.

लॉस एंजेलिसमधील सेडार्स-सिनाई मेडिकल सेंटरच्या पल्मोनोलॉजिस्ट आणि आयसीयू फिजिशियन डॉ. सारा घंदेहारी यांनी सांगितले की पुरुष जास्त प्रमाणात नशा करतात. तसेच, त्यांना प्रदूषणाला जास्त सामोरे जावे लागते. म्हणून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती महिलांपेक्षा कमकुवत आहे.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील ग्लोबल पब्लिक हेल्थच्या प्रा. सारा हॉक्स म्हणाल्या की पुरुषांच्या तुलनेत महिलांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत आहे हे खरे आहे. त्यामागे दोन सॅक्सच्युल हार्मोन्स आहेत. त्यांना एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन म्हणतात.

प्रा. सारा हॉक्स यांनी सांगितले की पुरुषांमधे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स स्त्रियांपेक्षा खूपच कमी असतात. या दोन हार्मोन्समुळे स्त्रियांमध्ये कोणत्याही संक्रमण आणि आजारांविरूद्ध लढण्यासाठी विशेष अंतर्गत प्रतिकारशक्ती विकसित होते. आता वैज्ञानिक याद्वारे पुरुषांची आजाराशी लढण्याची क्षमता वाढवता येईल का, हे पाहत आहेत.

स्टोनी ब्रूक्स युनिव्हर्सिटीचे मुख्य संशोधक डॉ. शेरॉन नॅश्मन म्हणाले की आम्ही यासंदर्भात कोरोना रूग्णांच्या छोट्या गटाची क्लिनिकल चाचणी करणार आहोत. यासाठी 110 रुग्ण निवडले जातील. यातील अर्ध्यांच्या शरीरावर एस्ट्रोजेन पॅचद्वारे उपचार होईल व अर्ध्यांवर सामान्य पद्धतीने उपचार होईल. आधीच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की महिलांमध्ये आढळणारा एस्ट्रोजेन हार्मोन कोरोना व्हायरसच्या उपचारात प्रभावी ठरू शकतो.

Leave a Comment