लॉकडाऊन : बिल गेट्स यांनी एवढ्या कोटींना खरेदी केला बीच व्हिला

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या महामारीमुळे जगभरातील कोट्यावधी लोक घरात कैद आहेत. मात्र दुसरीकडे  मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रींमत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी तब्बल 328 कोटी रुपयांचा बीच व्हिला खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

Image Credited – mensxp

गेट्स यांनी कॅलिफोर्नियातील सॅन डियागो येथे समुद्रकिनारी व्हिला खरेदी केला आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी हा व्हिला 43 मिलियन डॉलर्स म्हणजेच 328 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. यात सर्व लग्झरी सुविधा आहेत.

Image Credited – mensxp

या व्हिलामध्ये स्विमिंगपूल, 10 लोकांसाठी बाथ, 6 बेडरूम्स देखील आहेत. हे घर जवळपास 5800 स्केअर फूटमध्ये आहे. यावरूनच या शानदार घराचा अंदाज बांधता येतो.

बिल गेट्स हे जगातील दुसरे सर्वाधिक श्रींमत व्यक्ती असून, त्यांची संपत्ती तब्बल 95 बिलियन डॉलर्स एवढी आहे. त्यांचे बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन देखील 45 बिलियन एसेट्ससह जगातील सर्वात मोठे खाजगी फाउंडेशन आहे.

Leave a Comment