मुख्यमंत्री सहाय्यता निधीत टीक-टॉकची कोट्यावधींची मदत


मुंबई : सध्या सुरु असणाऱ्या कोरोना विरोधातील लढ्यात टीक-टॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि) आपला सहभाग नोंदवला आहे. या कंपनीकडून कोरोनाच्या या कठिणप्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटींची मदत जमा करण्यात आली असून या मदतीसाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कंपनीचे आभार मानले आहेत.

यासंदर्भात टीक-टॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी मुख्यमंत्री कार्यालयात पत्र पाठवून कोरोनी विरुद्धच्या त्यांच्या मदतीची माहितीही कळवली आहे. या पत्राच्या माध्यमातून ते मुंबई आणि महाराष्ट्रात टीक-टॉकच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारावर असून राज्याप्रतीच्या सामाजिक दायित्वाची त्यांना जाणिव असल्याचे म्हणाले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने गृहविभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिल्याची माहितीसुद्धा त्यांनी या पत्राद्वारे दिली.

कंपनीने टीक-टॉकचा वापर करणाऱ्यांपर्यंत यापूर्वीच कोरोनासंदर्भातील माहिती ऑनलाईन पद्धतीने पोहोचवत जनजागृतीही केली आहे. कोविड १९शी सुरु असणाऱ्या या युद्धात सहभागी होण्यासाठी टीक-टॉक ॲपवर लाईव्ह डोनेशन जमा करण्याच्या व्यवस्थेसह या मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. वैश्विक संकटाच्या या प्रंसंगी एक जबाबदार कॉर्पोरेट सिटिझन म्हणून या लढ्यात सहभागी होण्यासाठी, सहकार्य करण्यासाठीच कंपनीने ही पावले उचलली आहेत.

Leave a Comment