कोरोना : मुंबईला मिळाली सुपर मशीन, आता दुप्पट वेगाने होणार टेस्टिंग

कोरोनावर मात करण्यासाठी सर्वोत्तम उपाय हा अधिकाधिक टेस्टिंग असल्याचे सांगितले जाते. मुंबईला या लढाईत आता मोठे शस्त्र मिळाले आहे. महाराष्ट्र सरकारच्या मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्च विभागाला अमेरिकेत निर्मित एक मशीन मिळाली आहे. ज्याच्याद्वारे कोव्हिड-14 साठी टेस्ट स्वॅब्सची क्षमता दुप्पटीने वाढते.

थर्मो फिशर क्वांट स्टुडियो नावाची ही मशीन मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये आहे. एका दिवसात 2 हजार सँपल्सचे टेस्टिंग करणाऱ्या या मशीनला नाशिकमधील दातार कॅन्सर जेनेटिक्सने साडे तीन कोटी रुपयांमध्ये काही वर्षांपुर्वी खरेदी केले होते. आता ही मशीन डीएमईआरला मोफत देण्यात आली आहे. ही मशीन 8 तासात 2 हजार सँपल्सचे टेस्टिंग करू शकते.

दातार कॅन्सर जेनेटिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. राजन दातार यांनी सांगितले की, पूल टेस्टिंगला परवानगी मिळाल्यास 8 तासात 10 हजार सँपल टेस्ट करता येतील. काम करणारे लोक अधिक असतील तर अनेक शिफ्टमध्ये काम करता येईल.

जेजे हॉस्पिटलच्या लॅब अधिकाऱ्याने सांगितले की, मशीनला इंस्टॉल करण्यात आले आहे. मात्र विशेष आरएनए एक्सट्रॅक्शन किटची वाट पाहत आहोत. छोट्या मशीनमध्ये ज्या आरएनए एक्सट्रॅक्शन किटचा वापर करत असे, जे या मशीनमध्ये वापरता येत नाही. त्यामुळे त्याला बाहेरून मागवण्यात आले आहे. किट आल्यानंतर टेस्टिंग सुरू होईल.

Leave a Comment