प्लाझ्मा थेरेपी फक्त रिसर्चसाठी, उपचारासाठी नाही – सरकार

कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपी सध्या प्रायोगिक टप्प्यातच असून रुग्णासाठी हे जीवघेणे देखील ठरू शकते, असे सरकारने म्हटले आहे.

कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपी उपयोगी ठरत आहे याचा कोणताही अद्याप पुरावा नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केले. थेरेपी सध्या प्रायोगिक टप्प्यात असून, आयसीएमआर याचा राष्ट्रीय पातळीवर अभ्यास करत आहे. जर याची व्यवस्थित अमंलबजावणी केली नाहीतर हे जीवघेणे देखील ठरू शकते, असे ते म्हणाले.

मागील आठवड्यात दिल्लीमध्ये एका 49 वर्षीय कोरोना रुग्णावार प्लाझ्मा थेरेपीचे चांगले परिणाम झाल्याचे समोर आले होते. यामुळे प्लाझ्मा दान करण्याची देखील मागणी केली जात होती व मुंबईत देखील प्लाझ्मा थेरेपीचे ट्रायल सुरू करण्यात आले होते.

याआधी सार्स, इबोला आणि एच1एन1 व्हायरसवर प्लाज्मा थेरेपी कारगर ठरली होती. आयसीएमआरने स्पष्ट केले आहे की, प्लाझ्मा थेरेपीचा वापर केवळ वेंटिलेटरवर असलेल्या गंभीर रुग्णावरच करण्यात यावा.

Leave a Comment